काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी सकाळपासूनच चिंता व्यक्त केली जात असताना राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. "राजीव सातव यांच्यावर करोना आजाराचे उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे", अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली.
#RajivSatav #Coronavirus #Covid19 #Congress