औरंगाबाद : महाविकास आघाडी कडून मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. बच्चू कडू यांनी जाहीर केलेला उमेदवार माघार घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सुद्धा आमच्या उमेदवाराला मदत करेल आमच्यात काहीही मतभेद नसल्याचं ते म्हणाले. सरकार पडेल या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर विरोधी पक्षाचे काम असेच बोलायचं असते ते बोलतात असा टोला जयंत पाटील यांनी लावला.
( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #mahavikasaghadi #election