कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीपीआर रुग्णालयाला भेट दिली. येथे ऑक्सिजन टँकची पाहणी केली. तसेच कोरोना तपासणी कक्षालाही भेट दिली. राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर म्हस्के यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या साडेचार महिन्यात कोरोनारुग्ण वाढत आहेत, यात जिल्ह्यातील कोरोनाबाधितां बरोबरच गंभीर रुग्णांवर सीपीआरमध्ये उपचार होत आहेत. सिपिआर मध्ये तीनशेच्यावर बेड आहेत. त्याशिवाय ऑक्सिजन व जोडलेले शंभराहून अधिक बेड आहेत. व्हेंटिलेटरची सेवाही उपलब्ध आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हे सगळे उपचार प्रक्रियेत कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.