अकोला : वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा - महानगर, महिला आघाडी, सम्यक विध्यार्थी आंदोलन आणि युवक आघाडीच्या वतीने शहरातील बेताल वाहतुकीला व पार्किंगला वळण लावण्याच्या नावावर जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने नेमलेले टोईंग पथकाने मनमानी व नियमबाह्य वाहन उचलण्याच्या कार्यवाह्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना ह्यांचा प्रचंड त्रास होत आहे.ह्या विरोधात आज वंचितने शहर वाहतूक निरीक्षक कार्यालय गाठले.