बाप्पांच्या आगमनाबरोबरच आता शहरातील साठहून अधिक तालमींत मानाच्या पंजांची प्रतिष्ठापना होवू लागली आहे. साहजिकच सर्वत्र उद आणि धुपाच्या सुगंधाने माहौल भारलेला आहे. दरम्यान, बाबूजमाल दर्ग्यातील नाल्याहैदर पंजाची प्रतिष्ठापना काल रात्री उशिरा झाली. आज सायंकाळी पंजाच्या शेजारी बाबूजमाल तालमीच्या गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
गणेशोत्सव आणि मोहरमची धूम यंदाही एकाचवेळी असून शहरातील तालमींत एक वेगळाच माहौल आहे. सर्वधर्मसमभावासाठी ही तालीम संस्था ओळखली जाते. बत्तीस वर्षानंतर गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आला आहे. सामाजिक सलोखा आणि एकोप्याची भावना दृढ होण्यास मदत होईल एवढ नक्की..!