गणपती बाप्पा म्हणजे आबाल वृध्दांचे आवडते दैवत... गणपती बाप्पाच्या मुतींसमोर भक्तीभावाने उभारले की त्याच्या डोळ्यातील भाव भक्ताच्या अंत:करणापर्यंत पोचावे लागतात. आणि देवाची नजर आपल्यावर असावी अशी सर्व भक्तांची इच्छा असते. ही नजरानजर होत असेल तरच मुर्तीची खरी प्रसन्नता दिसुन येते. त्यामुळे गणेशमुर्ती घेताना भक्त बाप्पाचे डोळे आवर्जुन पहात असतात. आणि या मुर्तीच्या डोळ्यात प्राण आणणे हे त्या मुर्तीकाराचे कौशल्य असते. डोळ्यांची आखणी करणे म्हणजे गणेशमुर्तीचे डोळे तयार करणे आणि कपाळावर शिवगंध लावणे असा प्रचलीत शब्द आहे. खरेतर हिंदू शास्त्राप्रमाणे गणेशमुर्ती घरात आणल्यानंतर प्राण प्रतिष्ठापणा केली जाते. पण मुर्ती कोणत्याही स्वरुपात असो ती जिवंत दिसते ती त्याच्या डोळ्यांमुळेच... या डोळ्योची निर्मिती कशी होते याविषयी.....याचा ग्राउंड रिपोर्ट सकाळचे व्हिडीओग्राफर मोहन मेस्त्री यांनी केला आहे...
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #sakalmedia #Kolhapur #kolhapurnews