मूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करुन शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला.
कर्नाटक सरकारने बेळगाव तालुक्यातील मनुगृत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करुन विटंबना केली. त्यामुळे समस्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या.