वाशीम : येथील रेल्वेस्थानकाचा परिसर तसा गावकुसाबाहेर. 'नाही रे' ची वस्ती. म्हणायला शहराच्या शेजेला आणी महामार्गाच्या कडेला जरी असली तरी पिढ्यानपिढ्याच्या उपेक्षेचे हे वारसदारच ठरावेत इतकी उपेक्षा ही वस्ती सहन करतेय. याच वस्तीत एका चार टिनाच्या खोपटातून माणसाला शहाणं करणार्या तत्वज्ञानाचा दिव्य स्वर रोज बाहेर पडतो.