विदर्भ व नागपुरातील मंगळवारच्या (ता. १3) महत्त्वाच्या घडामोडी

2021-04-28 1,073

नागपूर : मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही हा प्रकार केला जात आहे. सोबतच महाराष्ट्रातही सरकार पाडण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण, हा महाराष्ट्र आहे, येथे महाराष्ट्र विकास आघाडी त्यांचा प्रयत्न कुठल्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, याची खात्री मी देऊ शकतो, असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) सोमवारी बारावीचा निकालाची घोषणा करण्यात आली. निकालाची एकंदरीत टक्केवारीचा विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.38 टक्काही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

नागपूर : प्रशासनातील अधिकारी अशा गलिच्छ पद्धतीचे राजकारण करत असतील, तर ते फार भयानक असल्याचेही जोशी यांनी यावेळी नमूद केले. साहील सैय्यद नामक व्यक्ती त्याच्या माणसाला उपरोक्त विषयासंदर्भात माहिती देत आहे. मी दयाशंकर तिवारी यांना समोर करतो आहे आणि ते प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप करताहेत, असा उल्लेख त्या ऑडीओ क्‍लीपमध्ये आहे. या क्‍लीपमध्ये जे बोलत आहेत, ते साहील सैय्यद पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार यांच्यासोबत ऍलेक्‍सिस हॉस्पिटलमध्ये धाड टाकत असतानाची त्यांचीही एक व्हिडीओ क्‍लीप बाहेर आल्याचेही जोशींनी सांगितले.

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : अंजनगावसुर्जी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाच्या घरातच मटक्‍याचे साहित्य सापडल्याने रविवारी (ता. 12) चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे संबंधित पोलिसाला खात्यातून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

भामरागड उपविभागातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या भटपार या गावातील मुन्शी देवू ताडो (वय 28) याला शनिवारी (ता. 11) नक्षलवाद्यांनी ठार केले होते.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Free Traffic Exchange

Videos similaires