कोल्हापूरमध्ये उद्यापासून (20 जुलै 2020) एक आठवडा लॉकडाऊन होत आहे. लॉकडाऊन संदर्भात लोकांना काही प्रश्न आहेत. हेच जनतेचे प्रश्न घेवून 'सकाळ'ने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी सवांद साधला. उद्योगांचे कामकाज, बॅंकांचे कामकाज, शेतीचे काम, गॅस वितरण, धान्य दुकान, दुध खरेदी-विक्री सुरु राहणार की बंद राहणार याबाबत जाणून घेतले.
आपणही आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. निवडक प्रश्न संबधीत अधिकाऱ्यांना विचारुन त्याची उत्तरे जाणून घेतली जातील.
रिपोर्टर - सुनील पाटील
व्हिडिओ - बी.डी. चेचर