खापरखेडा (जि. नागपूर) : येथील टी पॉईंट जुना चुंगी गोधनी नाका चौकवर काही पोलिस दोन युवकांना घेऊन वाहनांची तपासणी करीत होते. त्या युवकांनी खाकी पेंट व ब्लेक शूज घातले होते. परंतु, दोघांच्या अंगावर पांढरा शर्ट ऐवजी काळा शर्ट होता. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता कोरोनामुळे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांची मदत घेतल्याचे सांगितले.