ग्रामीण भागात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण

2021-04-28 2,338

गुमगाव (जि. नागपूर) : अवघ्या काही दिवसांमध्येच हिंगणा तालुक्‍यात कोरोना बाधितांची 'सेंच्युरी' झाली. नजीकच्या बुटीबोरी आणि वागदरा (नवीन गुमगाव) मध्ये कोरोनाने एन्ट्री केल्यानंतर गुमगावातही मंगळवारी कोरोनाचा रुग्ण आढळला. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये राहणाऱ्या आणि परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाची कोविड चाचणी मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली. तरुणाच्या संपर्कातील चौघांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले असून, परिसर सील करण्यात आला. तसेच परिसर सॅनिटाईज केला जात आहे. विशेष म्हणजे या तरुणाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे दिसून येते. (व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)

Videos similaires