पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील सांभाळतात उमरेड पोलिस ठाण्याच्या कारभार

2021-04-28 1,039

उमरेड (जि. नागपूर) : राजश्री संभाजीराव पाटील या 13 जुलै ते 23 ऑगस्ट असा एकूण सहा आठवडे उमरेड पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. सोमवारी त्यांच्या कामाचा पहिलाच दिवस आहे. उमरेड शहरातील अवैध धंदे, अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळणार, शहरात शांती व सुव्यवस्था कायम राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, पोलिसांचे कल्याणकारी कार्यक्रम, विशेषतः महिलांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना, गावभेटी घेऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवारण करणार आहे. शिवाय गुन्हेगारीवर प्रतिबंध घालून नागरिक व पोलिस प्रशासनात सलोख्याचे व विश्वासाचे संबंध जोडण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (व्हिडिओ : सतीश तुळसकर)

Videos similaires