अमरावतीत मेंढपाळ धनगरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर काठी घोंगडी मोर्चा

2021-04-28 388

अमरावती : मेंढपाळ धनगरांकडे स्वतःच्या मालकीची शेत जमीन नाही. बंदिस्त मेंढीपालन शक्‍य नाही. त्यासाठी सरकारने वनविभागाची व लगतची असलेली ई क्‍लास व एफ क्‍लास जी जमीन ताब्यात घेऊन ठेवलेली आहे. ती जमीन मेंढपाळ धनगरांना शंभर मेंढ्यामागे 20 एकर शेती लीजवर द्यावी, कोरोनाच्या काळात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मेंढपाळांना जंगलातून हाकलून लावले. त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा व मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मेंढपाळ धनगरासाठी स्पेशल सुरक्षा कायदा निर्माण करावा या मागणीसाठी संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना घोंगडी काठी देऊन धनगर बांधवांनी मागण्या शासन दरबारी मांडल्या. (व्हिडिओ : अमर घटारे)

Videos similaires