'पोपटपंची' पाहायचीय, मग नागपूरच्या या भागाला भेट द्या...

2021-04-28 47

नागपूर : सायंकाळ झाली की प्रत्येकाला आपापल्या घराची ओढ लागते. यातून पशूपक्षीही सुटले नाहीत. अजनी परिसरातील हे मनोहारी दृष्य त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. सूर्य मावळतीला गेला की, दिवसभर शेकडो किमीचा प्रवास करून लाखो पोपट येथील मोठमोठ्या झाडांवर विसावतात. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली की, पुन्हा प्रवासाला निघतात. कित्येक वर्षांपासून त्यांचा हा दिनक्रम नियमितपणे सुरू आहे. पोपटांच्या चिवचिवाटांमध्ये या भागांतील वाहनांचा आवाजही दबला जातो. हे दृष्य परिसरातील नागरिकांनाही मोठा आनंद देते. आजूबाजूचे नागरिक दररोज घराबाहेर पडून हे दृष्य न्याहाळत असतात. (व्हिडिओ : संदीप सोनी)

Videos similaires