राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरोना संकटात विदर्भात 26 जूनपासून विद्यार्थ्याविना शाळा सुरू झाल्यात. विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वर्ग भरवणे हे आव्हानात्मक आहेत. सरकारच्या नियमांचे पालन करीत राजुरा तालुक्यातील काही शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ धुण्याची सुविधा या दृष्टीने सर्व उपाययोजना करीत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वर्गात करताना बेंचवर नावे लिहिण्यात आलेली आहेत. विद्यार्थी फक्त आपल्या नावावर असलेल्या बेंचवरच बसतील. कोरोना संकटात आरोग्याची काळजी घेत विद्यार्थी शिक्षणासाठी स्वतःच्या तयारीने येत असल्याची माहिती प्रियदर्शनी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज पावडे व शालेय विद्यार्थ्यांनी दिली. (व्हिडिओ : आनंद चलाख-श्रीकृष्ण गोरे)