विदर्भ व नागपुरातील सोमवारच्या (ता. 6) महत्त्वाच्या घडामोडी

2021-04-28 1,553

नागपूर : कोरोना लस चाचणीसाठी नागपुरातील डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टी स्पेशॅलिटी रुग्णालयाला परवानगी मिळाली आहे. 

नागपूर : रेल्वेच्या ट्रॅकवर खासगी ट्रेन चालविण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. खासगी प्रवासी रेल्वे चालविल्या जातील त्या मार्गांमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत असणाऱ्या नागपूर-मुंबई आणि अकोला-मुंबई या मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे

नागपूर : शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली आहे. मात्र, दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडे मोबाईल आणि संसाधने नसल्याने येथील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश कसा पोहोचणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

वर्धा : भाजपच्या राज्य कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. या कार्यकारिणीत राजेश बकाने यांची महासचिवपदी नियुक्ती झाल्याने भाजपच्या जिल्हा कार्यालयात रविवारी (ता. पाच) त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

वर्धा : चीनसोबत सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी शासनाकडून 59 चिनी ऍपवर बंदी घातली. असे असताना फवारणीसाठी शेतकऱ्यांचा कल मात्र "चायना' पंपाकडे आहे. थोड्या मेहनतीत आणि कमी वेळात पिकांवर औषध फवारणी करणे शक्‍य असल्याने चिनी पंपाची शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे. 

यवतमाळ : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगविल्याच्या चक्क तीन हजार दोनशे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तक्रारदार शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. 

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Free Traffic Exchange

Videos similaires