अमरावती : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत आहे. रुग्णांना याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. अमरावतीत ही सुविधा उपलब्ध झाली आहे. आता उपचारांना गती मिळणार आहे. अमरावती जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी यंत्रणेचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आव्हान पालकमंत्र्यांनी केले. (व्हिडिओ : अमर घटारे)