पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे आंदाेलन

2021-04-28 208

कऱ्हाड : पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे..., कोण म्हणतोय देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाय..., बिचारी जनता करे पुकार, मोदी सरकार, मोदी सरकार..., मोदी सरकार, हाय, हाय... या ना अशा घोषणांनी आज (साेमवार) प्रशाकीय इमारतीचा परिसर दणाणुन गेला.
निमित्त होते कॉंग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधातील आंदाेलनाचे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन तेथुन बैलगाडीतुन प्रशासकीय इमारतीसमोर जावुन कऱ्हाड (जि.सातारा) येथे अभिनव पद्धतीने आंदोलन केले.
(व्हिडीओ : हेमंत पवार, कऱ्हाड)
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Congress #PetrolDiselPriceHike #PetrolDiselPrice #PrithvirajChavan #NarendraModi #Karad

Free Traffic Exchange

Videos similaires