चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरांना टाळे लागले. जिल्ह्याचे आराद्य दैवत देवी माता महाकाली मंदिरही तीन महिन्यांपासून कुलूपबंद आहे. त्यामुळे मंदिरासमोरील दुकानदार प्रचंड अडचणीत सापडले आहेत. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील भक्त येऊन देवीसमोर आपले गाऱ्हाणे मांडत होते. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता येऊनही मंदिरे सुरू झाली नाही. त्यामुळे या दुकान विक्रेत्यांनाच माता महाकालीकडे उघड दार देवा आता उघड दार देवा... असे म्हणण्याची वेळ आली आहे. (व्हिडिओ : साईनाथ सोनटक्के)