कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले जातील. गर्दीतून संसर्ग वाढू नये, यासाठी मिरवणुका आणि देखावे यंदा होणार नाहीत. एकीकडे उत्सवातून संसर्ग कमी होण्यासाठी प्रयत्न करतानाच कोरोनाग्रस्त किंवा गरजूंसह शासकीय यंत्रणांना आवश्यक मदतीसाठी पुढाकार घेऊन या लढाईला आणखी बळ दिले जाईल, अशी ग्वाही आज विविध गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.