अकोला : येथील आगरकर विद्यालयात एक लाख सीड बॉल तयार करण्यात आले आहेत. परिसरातील वड, पिंपळ या झाडाचे बीज संकलन करून व माती भिजवून त्यात बीज मिसळून त्याचे सीड बॉल तयार करण्यात आले. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. मात्र या काळात नमुगा नाथन यांनी एका महिन्यात एक लाख सीड बॉल तयार केले आहेत. त्याचबरोबर शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही यामध्ये उत्फुस्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये अजय गावंडे, नरेंद्र चिमणकर, सतीश उम्बरकार, आकाश ठाकूर, शिवदत्त शुक्ला, सौरभ बाछूका, पूजा काळे, प्रवीण काळे, बंडू बलोदे यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करित सीड बॉल तयार केले. (व्हिडिओ : अमित गावंडे)
#SeedBoll #Akola #Vidharbha #EsakalNews #SakalNews #MarathiNews #Video #Viral