निलांबरी, विष्णूबाळा पाटील, भेट, मी अमृता बोलतेय, जय आठरभुजा सप्तश्रृंगी माता, सावरखेड एक गाव, ब्लाइंड गेम, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, गोट्या, यंग्राड यासारख्या अनेक मराठी चित्रपटात अभिनेता धनंजय वाबळे याने काम केले आहे. काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रीकरण बंद आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून तो व्यायामाला प्राधान्य देत आहे. रसिकांनाही घरात राहून व्यायाम करण्याचे आवाहन त्याने केले आहे.