उस्मानाबादेत अखेर रस्त्यावर बस

2021-04-28 1,387

उस्मानाबाद : ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद मधून आजपासुन सकाळी लालपरी रस्त्यावर धावण्यास सुरवात झाली आहे. कालपासून तयारी म्हणून बसस्थानक धुवून घेतले आहे. उस्मानाबाद हुन कळंब, उमरगा साठी प्रत्येकी दोन बसेस तर तुळजापूर, भूम, परंडा येथून उस्मानाबाद कडे प्रत्येकी दोन गाड्या मिळून एकूण दहा बसगाड्या धावणार आहेत. सुरुवातीला गाड्यांची संख्या कमी असली तरी प्रवाश्यांच्या अशा पल्लवित करणाऱ्या ठरतील. आज सकाळी आगारातून पहिली बस सुटली.

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Videos similaires