घरातच राहून व्यायाम करा: अभिनेता चेतन वडनेरे

2021-04-28 1

"लेक माझी लाडकी", "फुलपाखरू", "अल्टी पल्टी सुमडीत कल्टी" यासारख्या गाजलेल्या मालिकांमधून अभिनेता चेतन वडनेरे याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या चित्रीकरण बंद आहे. या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून तो नियमित व्यायाम करत आहे. रसिकांनाही घरातच राहून व्यायाम करा, तंदुरुस्त राहा असा सल्ला त्याने दिला आहे.