लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीची पंचामृत महापुजा आरती पहा व्हिडीओच्या माध्यमातून...
सप्तश्रृंगगड (वणी):- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तश्रृंगगड ता. कळवण जि. नाशिक येथील सप्तश्रृंगी निवासिनी देवीचे मंदिर हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे...या मंदिर बंदच्या काळातही श्री भगवतीची प्रात समयीची काकड आरती, दैनंदिन पंचामृत महापुजा, दुपारची महानैवेद्य आरती व सायंकाळची सांज आरती व पूजा पुरोहित वर्ग नित्य नियमितपणे करीत आहेत.