औरंगाबाद : पैठण तालुक्यातील थेरगाव इथं बाजरीच्या पिकात लपून बसलेल्या बिबट्याला आज पकडण्यात आलं आहे. या बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करत त्याच्या पायाचा चावा घेतला. गावकरी, वनविभाग आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. त्याला गौताळा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचं वन विभागाने सांगितलं आहे.
(व्हिडीओ : हबीबखान पठाण)
#Leopard #AurangabadNews #SakalNews #Forest #Tiger #Paithan #Wildlife #Viralvideo #video #videos #marathinews #maharashtra #localnews #catchingleopard