औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे वयोवृद्धांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. याच दरम्यान, त्र्याहत्तर वर्षीय प्रभाकर दामू वाणी हे घरोघरी जाऊन दूध विक्री करत आहेत. प्रभाकर वाणी यांचा दिनक्रम पहाटे तीनलाच सुरु होतोय. कंपनीत काम करत असतानाच अचानक तीन महिन्यांचा संप झाला. यावेळी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने दुध व्यवसाय स्वीकारल्याचे श्री. वाणी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. (व्हिडिओ- हर्षद महामुनी, अतुल पाटील)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews #Prabhakar_Wani #Viral #viralvideo