कोल्हापुरात रंगाला शाही दसरा सोहळा

2021-04-28 161

#SakalMedia #Kolhapur #KolhapurroyalDussehraceremony
कोल्हापुरात रंगाला शाही दसरा सोहळा
कोल्हापूर - संस्थानकालीन परंपरा असलेला येथील शाही दसरा सोहळा मंगळवारी (ता. आठ) पारंपरिक उत्साहात साजरा झाला. ऐतिहासिक दसरा चौकात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व राजघराण्यातील सदस्यांनी शमी पूजन केल्यावर अपूर्व उत्साहात सोने लुटले. दसऱ्यानिमित्त श्री अंबाबाईची रथारूढ सीमोल्लंघन रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. सायंकाळी न्यू पॅलेस येथून मोटारीतून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे यांचे आगमन झाले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. ललकारी दिल्यानंतर पोलिस बॅंडच्या तालावर करवीरसंस्थानचे गीत सादर झाले. दसरा महोत्सव समितीच्या वतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत झाले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी शमीपूजन केल्यानंतर सोने लुटण्यासाठी एकच गर्दी उडाली. त्यानंतर मेबॅक मोटारीतून परताना कोल्हापूरकरांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Videos similaires