Loksabha 2019 : पार्थ पवांराची स्टंटबाजी : व्हिडीओ व्हायरल

2021-04-28 0

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा पळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाहतुक कोंडीत अडकल्याने सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभा ठिकाणी जात आहेत असा आशयाचा मेसेज त्या मध्ये वायरल करण्यात येत आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे.

पार्थ पवार सध्या पनवेल मधील विविध भागात असलेल्या कार्यकर्त्यांना व धार्मिक स्थळांना भेट देत आहेत. या कार्यक्रमा दरम्यान बुधवारी रात्रीचे 9 वाजल्याने लवकरात लवकर सर्व ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी पार्थ पवार यांची ही पळापळ सुरू होती. तसेच पनवेलमध्ये बुधवारी पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचं समोर आले आहे. त्याच बरोबर वाहतूक कोंडी झाली नसल्याचेही समोर येत आहे

Videos similaires