रत्नागिरी- खवळलेल्या समुद्रात मासेमारी नौका भरकटली. नौकेचे नियंत्रण कॅप्टनच्या हातून सुटलं होतं. अजस्त्र लाटा, त्यात फसलेली हर्णे येथील साई गणेश नौका. जिवाच्या आकांताने नौकेवरील खलाशी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. समुद्रातील हा थरार 'सकाळ'चे हर्णे येथील बातमीदार राधेश लिंगायत यांनी टिपला.