विज्ञानाधारित खेळणी बनविणे.. रासायनिक पदार्थांच्या आधारे बुडबुडे निर्माण करणे... आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये आणखी वस्तू, पदार्थ कशा बसवता येतील, या दृष्टीने त्याचे ‘रि-डिझायनिंग’ करणे.. प्रत्यक्षात एखादा छोटा रोबोट तयार करणे.. या सर्व गमतीजमती महाविद्यालयांत नाही, तर शाळांमध्ये सहावी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुला-मुलींना शिकविण्यास सुरवात झाली आहे.