पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांतील सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवणाऱ्या सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित केलेल्या उपक्रमाचे, आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता डेक्कन जिमखाना येथे मोठ्या थाटात उदघाटन झाले. या उपक्रमाला दोन्ही शहरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यालयीन वेळेत शहराच्या मध्यवर्ती भागांतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रोजची वर्दळ आज बरीच थंडावलेली दिसली. बहुतेक मार्गांवरून रोजच्यापेक्षा अधिक बसेस धावत असल्यामुळे, नागरिकांमधूनही समाधानाचे वातावरण दिसत होते.