सचिन झाला आंबेगाववाला! (व्हिडिओ)
पुणे - आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता आंबेगाववाला झाला आहे. सचिनने नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील आंबेगाव येथे "ब्लूमफिल्ड' या संकुलातील टुमदार बंगल्याचा ताबा गुरुवारी (ता. २७) घेतला. पुण्यात असताना सचिनने अंध विद्यार्थ्यांशी संवाद साधला.