जळगाव जिल्हा चोरट्यांना आंदण
मरगळलेली पोलिस यंत्रणा आणि शिरजोर झालेले दरोडेखोर, असंच चित्र सध्या जळगाव जिल्ह्यात दिसतंय. हा जिल्हा पोलिस सरकारदप्तरी संवेदनशील म्हणून नोंदवला गेलाय. गेल्या दोन महिन्यांपासून चोरी आणि दरोड्या्चाय घटनांची जिल्ह्यांत अक्षरश: मालिकाच सुरू आहे. जिल्हा जणू चोरट्यांना आंदण दिल्याप्रमाणं त्यांचा हैदोस सुरू आहे. पोलिस मात्र हारे-तुरे स्वीकारण्यात आणि सत्कार करून घेण्यात मग्न आहेत.