मुंबईत कालची (26 एप्रिल) एकूण कोरोना रूग्णसंख्या 4 हजारांच्या ही खाली गेली आहे. आणि कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण 87 टक्के एवढे झाले आहे. मुंबईत सर्वात जास्त झपाट्याने रुग्ण संख्या वाढत होती मात्र गेल्या काही दिवसांचा आलेख पाहता थोडे समाधान व्यक्त केले जात आहे.