राज्यातील करोना स्थितीवरुन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारसह शरद पवारांवर निशाणा साधला आहे. राज्यात तहान लागल्यावर आड काढायचा उद्योग चालला आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्हा पाळणा हालवणार का? असा टोलाही त्यांनी मोफत लसीकरणावरुन लगावला आहे.
#SadabhauKhot #SharadPawar #Coronavirus #Covid19 #Maharashtra #India