जगभरात 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. पंचमहाभूतं हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे आणि पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी एक आहे. आज ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये विविध स्तरातून आपल्याकडून कळत नकळत पृथ्वीला विनाशकारी अशा काही गोष्टी केल्या जातात.