महाराष्ट्र राज्याची परंपराच राहिलेली आहे ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आले जसे की किल्लारीचा भूकंप होतात मुंबईमध्ये झालेल्या 26 11 चा हल्ला होता किंवा रेल्वे मध्ये झालेले 16 बॉम्बस्फोट होते अशा अनेक प्रसंगाच्या वेळेस विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी हातात हात घालून काम केली त्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षात होतो विरोधी पक्षनेता होतो पण अशा संकटामध्ये कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी आज जळगाव येथे दिली आहे