शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ३ एप्रिलपासून सात दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय शुक्रवार घेण्यात आला आहे. या काळात उपाहारगृह, रेस्टॉरंट्स, मद्यालये, चित्रपटगृहे, धार्मिक स्थळेही बंद राहणार आहेत. मात्र, उपाहारगृहामधून पार्सल सेवा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
#India #COVID19 #Maharashtra #LockdowninPune #Pune