भोकरच्या दिवशी प्रकरणात आरोपीस ५९ व्या दिवशी फाशीची शिक्षा

2021-03-23 2,930

भोकर (जिल्हा नांदेड) : दिवशी (ता.भोकर) येथील पाच वर्षीय बालिकेवर सालगड्याने अत्याचार करुन तिचा निर्घृण खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला होता. या प्रकरणातील नराधमास भोकर येथील जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मंगळवारी (ता. 23) मार्च रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान हा निर्णय ऐकण्यासाठी तालुक्यातील अनेकांनी भोकर न्यायालयात गर्दी केली होती. हा न्यायनिवाडा अवघ्या 59 व्या दिवशी लागल्याने अशा प्रकारचा निकाल राज्यात पहिलाच असल्याचे बोलल्या जात आहे.
(व्हिडिओ ः करणसिंह बैस, नांदेड)

Videos similaires