अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. फू बाई फू मधून हेमंतने प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं आहे. त्यांचसोबत चोरीचा मामला. हिरकणी, बघतोस काय मुजरा कर , बस स्टाप अशा अनेक सिनेमांमधून हेमंतने आपलं मनोरंजन केलंय. हेमंतचं दिग्दर्शन असलेला 'झिम्मा' सिनेमा लवकच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा मे 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाउनमुळे प्रदर्शन रखडलं. हेमंतने लॉकडाउनचं वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी तसचं मालिका आणि नाटक क्षेत्रासाठी कसं राहिलं याचा अनुभव सांगितला आहे. तसचं या वर्षाने बरचं काही शिकवलं असून या काळात अनेक नव्या गोष्टी करणं शक्य झाल्याचंही तो म्हणाला.
#LoksattDigitalAdda #HemantDhome #1YearOfLockdown #CoronaVirus #Lockdown