तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात.....तिथे अगदी स्मित हास्य करुन कोणीतरी तुम्हाला सलाम करते....अगदी अदबीने तुमच्यासाठी ती व्यक्ती दार उघडते. आत आल्यानंतर तुम्हाला बसायला सांगते. तुम्हाला पाणी हवंय का? तुम्हाला काय खायला हवे असे आपुलकीने विचारतेय...पण हा सर्व संवाद होतो तो सांकेतिक भाषेत. तुम्हालाही असा अनुभव आलाय का? नसेल तर असा अनुभव घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल? हो ना...मग तुम्ही पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या टेरासीन या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. कारण येथे काम करणारी सर्व मुले मुकबधीर आहे, ज्यांना काहीही ऐकू येत नाही, बोलता येत नाही तरी तुम्हाला उत्तम सेवा देतात . पुण्यात अवघ्या 11-12 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या रेस्टॉरंटला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. सोनम कापसे यांनी आता Socially conscious Diningया नव्या कल्पनेवर टेरासीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. याबाबत बोलताना कापसे म्हणाल्या, ''टेरासीन सुरु करताना Socially conscious Dining ला आम्ही महत्त्व दिले आहे. शेतकरी आणि मुकबधिर मुलांना सोबत घेऊन टेरासीन रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. टेरासीनच्या या Socially conscious Dining कल्पनेमुळे शेतकऱ्यांनाच नव्हे तर मुकबधिर मुलांनाही आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली आहे