पुणे : कालपासून सुरू झालेल्या कोव्हॅक्सिन लसीकरणाचा पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन नोंदणी ते अडचण असल्यास प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन लस घेणाऱ्या नागरिकांत वाढ. कोथरूडच्या जयाबाई सुतार दवाखान्यात वॉर्ड मेडिकल ऑफिसर डॉ. अंजली टिळेकर व माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांचे विशेष प्रयत्न. आतापर्यंत २०० जणांनी लस घेतली असून, कोणालाही साईड इफेक्ट झालेला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.