औरंगाबाद मध्ये हॉटेल,रेस्टॉरंट बंद;१७ मार्चपासून पार्सल सुविधा सुरू

2021-03-15 964

औरंगाबादः हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये १७ मार्च पासून फक्त पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. हॉटेल मध्ये बसून कुणाला ही जेवण करता येणार नाही. ४ एप्रिल पर्यंत हा निर्णय लागु राहील असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच शहरी भागासह मागील काही दिवसांत ग्रामीण भागातही संसर्ग वाढत असून ज्या गावांमध्ये रूग्णसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, संबंधित आरोग्य अधिकारी या सर्वांनी एकत्रित प्रयत्नांतून तातडीने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. (व्हीडीओ- मधुकर कांबळे)

Videos similaires