मोदींना भाषणं कोण लिहून देतं?

2021-03-06 4,380

‘मन की बात’ असो किंवा इतर काही कार्यक्रम मोदी आपल्या भाषणामधून प्रभाव पाडताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांसाठीही ओळखले जातात. मोदींची फटकेबाजी ऐकून अनेकांना ही भाषणं नक्की कोण लिहितं असा प्रश्न पडतो. मोदी स्वत: ही भाषणं लिहितात का की त्यांना ती कोणी तयार करुन देतं? हे भाषण लिहिणाऱ्या टीममध्ये नक्की कोणाचा समावेश असतो? भाषण लिहिणाऱ्यांना किती पैसे दिले जातात?, असे शेकडो प्रश्न मोदींच्या भाषणासंदर्भात उपस्थित केले जातात. मात्र आता माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या भाषणांसंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. मोदींच्या भाषणांसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने नक्की काय माहिती दिलीय जाणून घेऊयात.

#NarendraModi #pmo #india #ModiSpeech