शेगावचे गजानन महाराज यांचा उद्या शुक्रवार, 5 मार्च रोजी प्रकट दिन आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र 23 फेब्रुवारी 1878 मध्ये त्यांचे प्रथम दर्शन झाले. त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. बुलढाणा मधील शेगाव येथे महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून माघ वद्य सप्तमी दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो.