अकोला- कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सामाजिक अंतर व आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करुन जिल्ह्यातील प्रतिबंधीत व प्रतिबंधीत क्षेत्र वगळून निर्बंधासह सोमवार (दि. 8) पर्यंत आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले.
सर्व प्रकारच्या सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्ठाने, दुकाने पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील, मात्र सर्व सबंधीत व्यवसायीक, दुकानदार तसेच कामगार यांनी त्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. ज्या प्रतिष्ठान, दुकान, व्यवसाय येथील सर्व संबंधीतांची कोविडची चाचणी निगेटीव्ह आली असेल, अशाच प्रतिष्ठान, दुकान, व्यवसायीक यांना त्यांची आस्थापने सुरु ठेवता येईल. अन्यथा अशी प्रतिष्ठाने सिल करण्यात येईल तसेच त्यांचेवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.