तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या व्हिके शशीकला यांनी काल बुधवारी संध्याकाळी आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. तमिळनाडूच्या विधानसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांत होणार आहेत. त्याआधीच त्यांच्या या घोषणेमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. मात्र तमिळनाडूच्या राजकारणात महत्त्वाची भुमिका वठवणाऱ्या व्हिके शशीकला नेमक्या आहेत तरी कोण? जयललिता आणि त्यांचं नातं काय? कसा राहिलाय त्यांचा राजकीय प्रवास? याविषयीच आपण आज बोलणार आहोत, आज काय विशेषमध्ये...