पिंपरी, ता. २७ : पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यापासून सोनं हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. राजकीय मंडळीसोबतच गडगंज संपत्ती असलेल्या बलाढ्य कुटुंबामध्येही कोण काय करेल याचा नियम राहिला नाही. आधी सोन्याच्या शर्टची चर्चा झाली. त्यानंतर कोरोना काळात सोन्याचा मास्क एकाने तयार केला. कित्येक ‘गोल्डन मॅन’ शहरात केवळ सोन्याच्या क्रेझमुळे नावारूपाला आले आहेत. परंतु, आता थेरगावमधील एका कुटुंबाने मुलाच्या लग्नात चक्क सोन्याची पत्रिका तयार केली आहे. त्यामुळे या थाटामाटात होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावरच नव्हे तर शहरभर रंगली आहे.
(सुवर्णा गवारे- नवले)